प्रणय जेष्ठांचा
आता त्या दोघी मराठी भाषीक बाजूला बरेचसे कानडी भाषीक त्यामुळे त्या अगदी बिनधास्त बोलत होत्या व मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होतो. व त्यांचे बोलणे मला विचीत्र वाटत होते. आपले वय झाले साठी ऊलटली म्हणजे आपल्याला आपल्या पत्नीवर प्रेम करण्याचा अधिकार सुध्दा नाही. आपण तिचा हात हातात घेऊ शकत नाही प्रेमाने तिच्याशी मन मोकळे बोलू शकत नाही. तिला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. हे सगळच जरा विचीत्र होते व माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे होते. आता पुर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसांचे आयुर्मान वाढले आहे. ऊत्तम वैद्यकीय सुविधा तसेच चांगले खाणेपिणे यामुळे निवृत्तीचे वेळी तब्येत ठीक असते. त्यामुळे उतारवयात सुध्दा जेष्ठ नागरिक चांगले हिंडू फिरु शकतात. ऊत्तम आरोग्य, स्वताचे स्वतंत्र घर यामुळे ते शांतपणे जिवन जगू शकतात. पण त्यांच्या शारीरिक गरजांचे काय त्याबद्दल तर बोलणही पाप समजले जाते. वास्तविक याच वयात ते बऱ्याचशा घरगुती जबाबदारीतून मुक्त झालेले असतात व जास्त मोकळेपणाने ते प्रणयाचा आनंद घेऊ शकतात. पण आपल्या देशात जिथे सेक्स हा शब्द उच्चारणे देखील वाईट समजले जाते तिथे ज्येष्ठांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा कोणी विचार सुध्दा करणार नाही. ज्येष्ठांना सुध्दा एकांताची गरज असते त्यांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा विचार सुध्दा कुणी करत नाही. वास्तविक सेक्स व खोडकरपणा खट्याळपणा या गोष्टी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे उतारवयातील आयुष्य हे आनंददायी होते. पण आपल्याकडे यांचा जेष्ठांचे बाबतीत विचार करणं सुध्दा पाप समजले जाते.
वास्तविक जर तुमची तब्येत ठणठणीत असेल, तुमचं खाणं पिणं व्यवस्थीत असेल व जर तुम्ही चांगले ऍक्टीव्ह असाल तर सेक्स मध्ये सुध्दा ऍक्टीव्ह राहू शकता. भले तरुण वयातील जोश नसेल पण तुम्ही त्याचा आनंद नीश्र्चीतच घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या शास्त्रीय संशोधनात आढळून आले की जेवढे तुम्ही सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तेवढे तुमचे शरीर स्वास्थ्यही ऊत्तम रहाते. तुमच्या शरीरात जे हार्मोन्स निर्माण होतात त्याने तुमचे बी.पी. नॉर्मल रहात असते. तुम्ही तुमच्या वयाच्या प्रमाणात जर सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तर हृदयस्वास्थ्य हे सुध्दा चांगले रहाते. पण आपल्याकडे जेष्ठ व्यक्तींचे असे ऍक्टीव्ह असणे सुध्दा चर्चेचा व कुचेष्टेचा विषय होतो.
खरे पहाता उतारवयातील सेक्स अथवा प्रणय नुसता शारीरिक नव्हे तर तो तुम्हाला मानसीक दृष्टीने सुध्दा उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचे मानसीक आरोग्य चांगले राहते. पती पत्नी दोघेही त्यांचे आयुष्य अधिक आनंददायी घालवून आनंद मिळवू शकतात. अर्थात यासाठी सुध्दा मुले समंजस असायला हवीत व त्यांनी आपल्या आई वडिलांना सुध्दा एकांताची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जिवनाच्या ऊत्तरार्धात जितके तुम्ही आनंददायक पध्दतीने रहाल तितक्या व्याधी तुमच्या पासून दूर पळतात. तेव्हा सर्व ज्येष्ठांनो मस्त आनंदाने रहा व आपले जिवन आनंदमय करा.
सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.
लेखाचे शिर्षक वाचून थोडे चक्रावलात ना ? हे असेच होते. मुळात आपल्या समाजात प्रणय या विषयावर बोलणेच जिथे अनैतीक समजले जाते तिथे जेष्ठ व्यक्तींच्या प्रणयाची चर्चा करणे हे महापापच समजले जाईल. मुळात जेष्ठ व्यक्ती प्रणय करतात किंवा त्यांना एकमेकांचा सहवास आवडतो व ती एक मानवी शरिराची नैसर्गिक गरज आहे हेच मुळी आपल्याकडे मान्य केले जात नाही. त्याबाबत नुकताच आलेला अनुभव.
मी व माझी पत्नी आमच्या नातीला घेऊन बागेत गेलो होतो. बंगलोर सारखे मोठे शहर जेथे भारतातील वेगवेगळ्या भागातील मुले मुली नोकरी निमित्ताने रहात असतात. त्यांचे पालक अधून मधून येत असतात. माझी पत्नी नातीला जवळच घसरगुंडीवर खेळवत होती व मी बाजूला एका बाकावर बसलो होतो. मला माझ्या पाठीमागे मराठीमध्ये दोन बायका बोलत असल्याचे जाणवले तर पाठीमागील बाकावर माझ्यासारख्याच दोन मराठी भाषीक जेष्ठ बायका बोलत होत्या. आता बंगलोर हे एक पर्यटन स्थळ असल्याने तेथे भारतीय लोकां प्रमाणे परदेशातील पर्यटक सुध्दा येत असतात. तेवढ्यात त्या दोन बायकांच्या समोरून एक युरोपियन जेष्ठ कपल गेले. दोघेही मस्तीत एकमेकांचा हातात हात घेत चालले होते. त्या युरोपियन स्त्रिने तिच्या जोडिदाराच्या कानात काही तरी सांगितले तर त्यावर त्याने हसून तिच्या गालाचे चुंबन घेतले व ती दोघे हसत हसत हातात हात घालून पुढे गेले. ते पाहून एक बाई दुसरीला “ बाई बाई बाई काय मेलं वागणं, बघीतलस ना, ना जनाची ना मनाची लाज. आपल वय काय? आपण करतोय काय काही म्हणजे काही धरबंध नाही.” दुसरी बाई “ नाही तर काय, मला तर बघूनच अगदी शरमल्या सारखं झालंय. आपल्याला बघायला नको वाटतय ते मस्त हातात हात घालून फिरतायत.आता त्या दोघी मराठी भाषीक बाजूला बरेचसे कानडी भाषीक त्यामुळे त्या अगदी बिनधास्त बोलत होत्या व मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होतो. व त्यांचे बोलणे मला विचीत्र वाटत होते. आपले वय झाले साठी ऊलटली म्हणजे आपल्याला आपल्या पत्नीवर प्रेम करण्याचा अधिकार सुध्दा नाही. आपण तिचा हात हातात घेऊ शकत नाही प्रेमाने तिच्याशी मन मोकळे बोलू शकत नाही. तिला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. हे सगळच जरा विचीत्र होते व माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे होते. आता पुर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसांचे आयुर्मान वाढले आहे. ऊत्तम वैद्यकीय सुविधा तसेच चांगले खाणेपिणे यामुळे निवृत्तीचे वेळी तब्येत ठीक असते. त्यामुळे उतारवयात सुध्दा जेष्ठ नागरिक चांगले हिंडू फिरु शकतात. ऊत्तम आरोग्य, स्वताचे स्वतंत्र घर यामुळे ते शांतपणे जिवन जगू शकतात. पण त्यांच्या शारीरिक गरजांचे काय त्याबद्दल तर बोलणही पाप समजले जाते. वास्तविक याच वयात ते बऱ्याचशा घरगुती जबाबदारीतून मुक्त झालेले असतात व जास्त मोकळेपणाने ते प्रणयाचा आनंद घेऊ शकतात. पण आपल्या देशात जिथे सेक्स हा शब्द उच्चारणे देखील वाईट समजले जाते तिथे ज्येष्ठांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा कोणी विचार सुध्दा करणार नाही. ज्येष्ठांना सुध्दा एकांताची गरज असते त्यांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा विचार सुध्दा कुणी करत नाही. वास्तविक सेक्स व खोडकरपणा खट्याळपणा या गोष्टी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे उतारवयातील आयुष्य हे आनंददायी होते. पण आपल्याकडे यांचा जेष्ठांचे बाबतीत विचार करणं सुध्दा पाप समजले जाते.
वास्तविक जर तुमची तब्येत ठणठणीत असेल, तुमचं खाणं पिणं व्यवस्थीत असेल व जर तुम्ही चांगले ऍक्टीव्ह असाल तर सेक्स मध्ये सुध्दा ऍक्टीव्ह राहू शकता. भले तरुण वयातील जोश नसेल पण तुम्ही त्याचा आनंद नीश्र्चीतच घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या शास्त्रीय संशोधनात आढळून आले की जेवढे तुम्ही सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तेवढे तुमचे शरीर स्वास्थ्यही ऊत्तम रहाते. तुमच्या शरीरात जे हार्मोन्स निर्माण होतात त्याने तुमचे बी.पी. नॉर्मल रहात असते. तुम्ही तुमच्या वयाच्या प्रमाणात जर सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तर हृदयस्वास्थ्य हे सुध्दा चांगले रहाते. पण आपल्याकडे जेष्ठ व्यक्तींचे असे ऍक्टीव्ह असणे सुध्दा चर्चेचा व कुचेष्टेचा विषय होतो.
खरे पहाता उतारवयातील सेक्स अथवा प्रणय नुसता शारीरिक नव्हे तर तो तुम्हाला मानसीक दृष्टीने सुध्दा उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचे मानसीक आरोग्य चांगले राहते. पती पत्नी दोघेही त्यांचे आयुष्य अधिक आनंददायी घालवून आनंद मिळवू शकतात. अर्थात यासाठी सुध्दा मुले समंजस असायला हवीत व त्यांनी आपल्या आई वडिलांना सुध्दा एकांताची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जिवनाच्या ऊत्तरार्धात जितके तुम्ही आनंददायक पध्दतीने रहाल तितक्या व्याधी तुमच्या पासून दूर पळतात. तेव्हा सर्व ज्येष्ठांनो मस्त आनंदाने रहा व आपले जिवन आनंदमय करा.
सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.
No comments:
Post a Comment