वृध्दपण कसे आनंदी करावे
मानवी जिवनाचे साधारण चार टप्पे मानले जातात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व व वार्धक्य. यामधे सर्वसामान्यपणे प्रौढत्वा पासूनचा काळ वयाच्या पन्नाशी नंतर समजला जातो तो साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत व त्यानंतर वृध्धापकाळ समजला जातो. ह्याच काळातील व्यक्ती ही जेष्ठ नागरिक म्हणून संबोधली जाते. यातील ५० ते ६० वर्षे या काळात व्यक्ती बऱ्यापैकी कामकाज नोकरी व्यवसाय करत असते त्यामुळे ६० व्या वर्षी निवृत्त झालेल्या व्यक्तीस समाजामध्ये जेष्ठ नागरिक असे म्हटले जाते.
पुर्वीच्या काळाच्या तुलनेत आता वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने आयुर्मान वाढले आहे. व संपूर्ण जगात दिवसेंदिवस जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून जेष्ठ नागरिक हे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहेत व ते नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. त्याचबरोबर अशा जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही समाज व शासन अशी दोघांची जबाबदारी आहे. या साठी सुदृढ आणि निरोगी कुटूंब व्यवस्था असावी लागते. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरातील जेष्ठांची काळजी ही कुटुंबातील तरुण पिढी घेत होती. पण दिवसेंदिवस ही परिस्थिती आता बदलत आहे व विभक्त कुटुंबपद्धती ही वस्तुस्थिती बनली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. मुलगा नोकरी निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थाईक झाला आहे तर आई वडील त्यांच्या घरी अशी ऊदाहरणे सर्वत्र पहायला मिळतात. आपल्या देशात सरकारी पातळीवर शासन जेष्ठ नागरिकांच्या साठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण एकंदरीत आर्थीक परिस्थिती विचारात घेता त्यास मर्यादा येतात. त्यामुळे आपला वृध्दापकाळ आनंदाने घालविण्यासाठी प्रत्त्येक जेष्ठ नागरिकांनी काही बाबतीत स्वताच काळजी घेणे आवश्यक आहे.
आता यातील पहिला महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक शिस्त होय. आपण निवृत्त होण्यापूर्वी नोकरी व्यवसाय करत असतानाच आपली निवृत्ती नंतरची आर्थीक सोय करुन ठेवणे. त्यामुळे निवृत्ती नंतर पेन्शन नसल्यास कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा जास्त व्याजाचे लोभापायी असुरक्षित ठिकाणी कधी गुंतवणूक न करणे. त्यामुळे व्याज थोडेसे कमी मिळेल पण मुदलात घाटा येणार नाही व आपले दैनंदीन जीवन सुरळीत चालू राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. त्यासाठी नियमीत व्यायाम, योगासने व वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व जी औषधे सांगीतली असतील ती न चुकता घ्यावी म्हणजे स्वत:ला व आपल्या मुळे अन्य कोणालाही त्रास होणार नाही. अशा प्रकारे स्वताची स्वत: काळजी घेतल्यास आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक संबंध. आपल्या मुलाचे लग्न झाले असेल तर त्याच्या संसारात फार ढवळाढवळ न करणे. एखाद्या बाबतीत सल्ला विचारला तर जरूर द्यावा पण कायम लुडबुड करु नये. शरीरप्रकृती ऊत्तम असेल तर घरातील छोटी मोठी कामे जरुर करावीत त्यामुळे शारिरीक हालचाल होऊन व्यायाम होईल मुलगा व सून यांना घरातील कामास हातभार लागेल. त्यामुळे आपोआपच घरातील वातावरण खेळकर व आनंदी राहील. आपणास जर सामाजिक कामाची आवड असेल तर अशा संस्थाशी संपर्क ठेवून शक्य तेवढी मदत करावी. संगीत किंवा नाटक यांची आवड असेल तर अशा कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित रहावे. त्यामुळे आपले तन व मन प्रफुल्लित राहील.
आपला वृध्दापकाळ किती आहे हे कोणीही सांगू शकत नाही, पण परमेश्वराने जे आयुष्य आपणास दिले आहे ते आनंदात जाईल याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जर स्वत:ची स्वत: वरीलप्रमाणे काळजी घेतली तर आपला वृध्दापकाळ तो आनंदात व सुखासमाधानाने घालवू शकेल.
सुरेश काळे
सातारा
९८६०३०७७५२

No comments:
Post a Comment